महत्वाचे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध

0
301

माणदेश एक्सप्रेस न्युज/मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ३८५ नवीन पदांच्या भरतीसाठी काल (दि.१८) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित संयुक्त परीक्षा-२०२५ साठी उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. या संदर्भातील अधिकृत माहिती एमपीएससीने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

एमपीएससीने जाहीरातीत म्हटले आहे की, “महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण ३८५ पदांच्या भरतीकरीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये राज्यसेवेच्या सामान्य प्रशासन विभागासाठी (१२७), वन सेवेच्या महसून व वनविभागासाठी (१४४) तर स्थापत्य अभियांत्रिकीच्या सार्वजनिक बांधकाम विभागासाठी (१४४) जागांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यात येणार आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार २८ मार्चपासून सुरू होत असून, १७ एप्रिल अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे, असे देखील आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीत म्हटले आहे. पदभरती संदर्भातील माहिती आय़ोगाने त्यांच्या एक्स सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. तसेच अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या असेही म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here