अजित पवारांच्या घरी मंगलकार्य! जय पवारांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद

0
222

माणदेश एक्स्प्रेस/पुणे : पवार कुटुंब एका मंगल कार्याच्या निमित्ताने एकत्र येताना दिसणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लहान सुपूत्र जय पवार हे लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. जय पवार यांनी आजोब शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीचे फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी जय पवारांचे लग्न निश्चित झाल्याची बातमी दिली.राजकारणात फारसे सक्रिय नसलेल्या जय पवार यांच्यामुळे आता पवार कुटुंब एकत्र येताना दिसणार आहे.

jay pawar meet sharad pawar supriya sule shared photo of ajit pawar son  marathi news | PHOTO : मुहूर्त ठरला! पवारांच्या घरी मंगलकार्य, जय पवारांनी  घेतला शरद पवारांचा आशीर्वाद

 

जय पवार यांनी होणारी पत्नी ऋतुजा यांच्यासोबत आजोबा-आजी म्हणजेच शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीचे फोटो पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी जय पवार यांचे अभिनंदन केले आहे. जय पवार यांचा लवकरच साखरपुडा होणार असल्याचे समजते.

 

jay pawar meet sharad pawar supriya sule shared photo of ajit pawar son  marathi news | PHOTO : मुहूर्त ठरला! पवारांच्या घरी मंगलकार्य, जय पवारांनी  घेतला शरद पवारांचा आशीर्वाद

 

जय पवार यांचा सुरूवातीच्या काळात राजकारणात फार रस नव्हता. त्यांचे मोठे बंधू पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी उद्योग व्यवसायाकडेच लक्ष दिले. काही वर्षे त्यांनी परदेशात व्यवसाय केला.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here