
माणदेश एक्सप्रेस/शिराळा : शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची विक्रमी रांगोळीचा लोकार्पण सोहळा पार पडला. रंगावलीकार सुनील कुंभार यांनी १८ रंगांच्या २४०० किलो रांगोळीत ७००० चौरसफुटात ३५ तासांत छत्रपती संभाजी महाराजांची रांगोळी रेखाटली.
हा उपक्रम अँड रेणुकादेवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. ही रांगोळी डोंगरी भागात राहणारा, शिराळाचा भूमिपुत्र, अयोध्या प्रसिद्ध रांगोळी कलाकार सुनील कुंभार यांनी रेखाटली. १६ मार्च पर्यत रांगोळी पाहण्यासाठी खुली राहणार आहे.