सोन्याने मरगळ झटकली, चांदी नरमली, किंमत जाणून घ्या आजच्या किंमती

0
1165

माणदेश एक्स्प्रेस न्युज : मुंबई : गेल्या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात 1360 रुपयांनी सोने महागले होते. तर चांदीने चांगली झेप घेतली होती. ग्राहकांना गेल्या आठवड्यात मौल्यवान धातुने दिलासा दिला होता. तर या सोमवारी सोने वधारले. तर चांदी घसरली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…

गेल्या आठवड्यात सोमवारी 760 तर मंगळवारी 600 रुपयांनी सोने महागले होते. त्यानंतर त्यात सतत घसरण दिसली. तर या सोमवारी, 10 मार्च रोजी सोने 110 रुपयांनी वधारले. आज सकाळच्या सत्रात सुद्धा महागाईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,065 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

गेल्या आठवड्यात चांदी 2100 रुपयांनी महागली. गेल्या सोमवारी आणि बुधवारी 1,000 रुपयांनी वधारली होती. त्यानंतर पण किंमतीत किरकोळ बदल दिसला. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,000 रुपये इतका आहे.

 

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,932, 23 कॅरेट 85,588, 22 कॅरेट सोने 78,714 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,449 रुपये, 14 कॅरेट सोने 50,270 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,634 रुपये इतका झाला.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here