एसटीमध्ये विनयभंग; सांगलीत एकास अटक

0
949

माणदेश एक्स्प्रेस/सांगली : एसटी बसमधून गावी परतत असताना एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रकार आष्टा ते सांगली प्रवासादरम्यान घडला. ही बाब पीडितेने सांगली बसस्थानकावर येताच सांगितल्यावर नागरिकांनी संशयिताला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

 

 

पुण्यात नोकरी करणारी ही तरुणी काल रात्री पुण्याहून कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी शिवशाही बसने निघाली होती. रात्री ११ च्या सुमारास संशयित आष्टा बस स्थानकावर बसमध्ये आला. आष्टा ते सांगली प्रवासादरम्यान त्याने विनयभंग केला. बस सांगलीत आल्यानंतर हा प्रकार पीडितेने वाहक-चालकांना सांगितला. हा प्रकार समजताच अन्य प्रवाशांनीही या तरुणाकडे विचारणा करत असताना पोलीसही बसस्थानकात पोहचले. पोलिसांना पाहताच तरुणाने पलायन करण्याचा प्रयत्न केला. अन्य प्रवासी व पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडून बेदम चोपही दिला. यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here