
माणदेश एक्स्प्रेस/पुणे : पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यती राज्यभरात प्रसिद्ध आहेत. गावागावांमध्ये होणाऱ्या जत्रांच्या वेळी बैलगाडा शर्यती होत असतात. या शर्यतीत परिसरातील शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी होत असतात. पुण्यातील वाघालो येथील बैलगाडा शर्यतीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओत शर्यतीत विजेतेपद मिळाल्यानंतर 80 वर्षीय तरुणाने (अजोबा) केलेला जल्लोष दिसत आहे. एखाद्या तरुणाला लाजवणारा जल्लोष 80 वर्षीय अजोबांनी केला आहे. उड्या मारताना आपणास एक नंबर आनंद मिळतो, असे आजोबा चांगदेव शेंडगे यांनी म्हटले आहे. विजता झाल्याचे समजल्यावर त्यांनी मैदानात बैठकाही लगावल्या, दंड थोपाटले, कोलांट्या उड्या मारल्या होत्या. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
80 वर्षीय बैलगाडा प्रेमी असलेल्या चांगदेव शेंडगे म्हणजे चांगदेव नानांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नाना अनोख्या स्टाईलने आनंद व्यक्त करताना दिसत आहे. शर्यतीत त्यांची बैलगाडी प्रथम आली. त्यांना ट्रॅक्टर बक्षीस मिळाले. त्यानंतर नानांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी जोरदार स्टंट करत मैदानाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. मग काही लोकांनी त्यांचा हा व्हिडिओ करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
आपल्या छंदाबद्दल चांगदेव नाना माध्यमांशी बोलताना म्हणाले, उड्या मारताना येणारा आनंद एक नंबर वाटतो. बैलगाड्या शर्यतीचा छंद लहानपणापासून आहे. परंतु उड्या मारण्याचा छंद त्यापूर्वीपासून आहे. माझ्या भावाला बैलगाड्या शर्यतीचा छंद होता. तो मलाही लागला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल ते म्हणाले, मी फोन वापरत नाही. त्यामुळे मला कोणाचे फोन आले नाही. परंतु परिसरातील लोकांना माझा हा छंद माहीत आहे.
पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीत विजेत्या ठरल्यानंतर 80 वर्षीय तरुणाचा जल्लोष, VIDEO व्हायरल pic.twitter.com/DmEsbOxU3h
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2025