1 जूनपासून पैशांशी संबंधित 8 महत्त्वाचे बदल लागू – ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम

0
350

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई – नवीन आर्थिक महिन्याच्या सुरुवातीसच, म्हणजे 1 जूनपासून देशभरात पैशांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या व्यवहारांवर आणि खिशावर होणार आहे. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात घट, युपीआय व्यवहार, पीएफ क्लेम, आधार अपडेट, म्युच्युअल फंड नियम यांचा समावेश आहे.

 

नवे आर्थिक नियम – 1 जूनपासून लागू होणारे महत्त्वाचे 8 बदल:

ईपीएफओ 3.0 लाँच:
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) नवीन प्लॅटफॉर्म ‘ईपीएफओ 3.0’ लाँच करणार आहे. यामुळे पीएफ क्लेम करणं अधिक सुलभ होणार असून, लवकरच एटीएम किंवा युपीआयद्वारेही पीएफ मधून पैसे काढता येणार आहेत.

मोफत आधार अपडेट सुविधा संपुष्टात:
अद्यापपर्यंत ऑनलाइन मोफत आधार अपडेट करता येत होते. मात्र, 1 जूनपासून या सेवेवर 50 रुपयांचे शुल्क आकारले जाईल.

कोटक बँक क्रेडिट कार्ड बाऊन्स शुल्क:
कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल – ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाल्यास आता 2% ‘बाउन्स चार्ज’ आकारला जाणार आहे.

इंधन दर बदल:
सीएनजी, पीएनजी आणि एटीएफ (एव्हिएशन टरबाईन फ्युएल) च्या किमती 1 जूनपासून नव्याने निश्चित होणार आहेत. दरवाढ किंवा दरकपात याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्यावसायिक एलपीजी दरात कपात:
19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 17 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्ससाठी थोडा दिलासा मिळणार आहे.

रेपो दरात कपात:
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात करण्यात आलेली असून, यामुळे कर्जांचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे. आणखी कपात अपेक्षित आहे.

ओव्हरनाईट म्युच्युअल फंडसाठी नवीन कट-ऑफ वेळ:
सेबीने ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनेसाठी नवीन कट-ऑफ वेळ लागू केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना व्यवहाराच्या वेळेची अधिक शिस्त लावावी लागणार आहे.

युपीआय व्यवहारात नवीन फॉरमॅट:
युपीआय पेमेंट करताना आता वापरकर्त्यांना केवळ बँकेचे नाव दिसेल. QR कोडमध्ये कोणतीही संपादन माहिती दिसणार नाही.

1 जूनपासून लागू होणारे हे नियम सर्वसामान्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर प्रभाव टाकणार आहेत. ग्राहकांनी या बदलांची माहिती घेऊन व्यवहार करणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे ठरेल.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here