या वयातही उत्साह कायम! ७० वर्षाच्या आजीबाईंनी धरला गरब्यावर ठेका; गावाकडचा VIDEO व्हायरल

0
209

Elderly Woman’s Joyful Garba Dance At 70 : सध्या सगळीकडे नवरात्रीची धूम पाहायला मिळते आहे. यंदा २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर गरबा- दांडिया खेळण्याची वेगळीच मजा असते. कोणी अगदी फिल्मी गरबा, तर कोण अगदी प्रोफेशनल गरबा, तर कोण अगदी पारंपरिक पद्धतीने गरबा खेळताना दिसतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये डोक्यावर पदर घेऊन चक्क आजीबाई गरबा खेळताना दिसून आल्या आहेत.

 

शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते. प्रतिपदेच्या दिवशी देवीची मूर्ती किंवा कलश स्थापित करून नवरात्रातील नऊ दिवस पूजाविधी केले जातात आणि रात्री गरबा खेळला जातो. तर नवरात्री दरम्यान दरम्यान गावाकडचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये गावाकडच्या काही महिला आणि एक आजी गरबा खेळताना दिसते आहे. आजी ७० वर्षाची असून तिचा गरबा खेळण्याचा उत्साह अगदी तरुण मंडळीसारखा आहे. यासगळ्यात आणखीन एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे.

 

गावाकडे गरबा खेळणाऱ्या या महिलांनी आणि आजींनी कोणतीही चनिया चोली परिधान केली नाही. पण, त्यांचा गरबा खेळण्याचा उत्साह अगदी स्पष्ट दिसतो आहे. अगदी मराठमोळ्या पद्धतीत साड्या नेसून, डोक्यावर पदर घेऊन अगदी साध्या पद्धतीने गरबा खेळताना आजी दिसत आहेत. आजीने गरब्याच्या गाण्यावर धरलेला ठेका, त्यांची गरबा खेळण्याची आवड अनेकांना भरपूर आवडली आहे आणि “हीच आपली संस्कृती” असे अनेक जण म्हणताना दिसत आहेत.

 

तसेच “ह्याला बोलतात खरा गरबा! लोक काय बोलतील ह्याच विचार न करता खऱ्या अर्थाने आपल्याच नातवंडा बरोबर आनंद लुटताना आमच्या गावची आजी” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “डोक्यावरचा पदर न पडू देणारी शेवटची पिढी”, “आवड असली की, कोण काय बोलतंय त्याने काही फरक पडला नाही पाहिजे”, “ह्याला म्हणतात गरबा… देवीचे खऱ्या अर्थाने जागरण. नाहीतर आत्ताचे गरबे बघवत नाही रे बाबा”, “यातच तर खरी मज्जा आहे” : आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here