सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे! उत्तम आरोग्य मिळेल- सौंदर्यही खुलेल

0
111

सध्या प्रत्येकाच्या आरोग्याच्या काही ना काही समस्या आहेत. यातल्या बहुतेक समस्या या अपचनामुळे होणाऱ्या आहेत. खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित झाले नाही तर त्यातूनच मग वजन वाढणे, ॲसिडीटी, अपचन असे त्रास होतात. याशिवाय पोट खराब असेल तर त्याचा परिणाम आपोआपच चेहऱ्यावरही पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन या स्वरुपात दिसून येतो. त्यामुळेच अन्नपचन व्यवस्थित होणे अतिशय गरजेचे आहे. आणि ते होण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी पिणं अधिक लाभदायक ठरतं.

 

जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे

१. जिऱ्याचं पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने पचनासाठी उपयुक्त ठरणारे एन्झाईम्स ॲक्टीव्ह होतात आणि त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते.

२. चयापचय क्रिया अधिक चांगली होते आणि त्यामुळे शरीरावरील चरबी अधिक जलदपणे विरघळण्यास मदत होते.

३. जिऱ्याचं पाणी हे नॅचरल बॉडी डिटॉक्स ड्रिंक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे शरीरातील अशुद्ध, विषारी घटक शरीराबाहेर येण्यास मदत होते.

४. जिऱ्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेवरील चमकदारपणा वाढविण्यास उपयुक्त करतात.

५. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिरा पाणी पिणे फायद्याचे ठरते.

६. मासिक पाळीच्या काळात पोट खूप दुखत असेल तर जिऱ्याचं पाणी प्यायल्यास वेदना कमी होतात.

जिऱ्याचं पाणी कसं तयार करावं?

१. पहिल्या पद्धतीनुसार रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाण्यात १ चमचा जिरे टाका आणि ते हलवून घ्या. त्यानंतर ग्लासवर झाकण ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि प्या.

२. किंवा १ ग्लास पाण्यात १ चमचा जिरे टाका आणि ते पाणी गॅसवर ७ ते ८ मिनिट उकळवून घ्या. त्यानंतर ते पाणी गाळा आणि गरम असतानाच प्या.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here