साप चावल्याने २६ वर्षीय तरुणाचा लग्नाच्या दिवशी मृत्यू

0
532

उत्तर प्रदेशातील बुलंदरशहराच्या दिबई परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. साप चावल्याने एका २६ वर्षीय तरुणाचा लग्नाच्या दिवशी मृत्यू झाला. ही घटना अकरबास गावात घडली. प्रवेश कुमार असं मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रवेशचे लग्न होते त्यामुळे तो शेजारच्या गावी लग्नासाठी जात होता त्यावेळी झाडाझुडपातून एक साप आला आणि सापाने त्याला दंश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी प्रवेशचा लग्नाची तयारी सुरु झाली. लग्नाची मिरवणूक घरातून निघाली. रात्रीच्या वेळी प्रवेश लघवी करण्यासाठी झाडाझुडप्यांजवळ गेला. बराच वेळ हा तो परतलाच नाही त्यामुळे नातेवाईकांनी त्याची शोध घेतली त्यावेळी प्रवेश बेशुध्द अवस्थेत पडलेला होता. साप चावल्याचे नातेवाईकांना माहिती मिळाली. त्याने लगेच नवरदेवाला बूवाकडे नेलं. परंतु साप विषारी होता त्यामुळे त्याचा जीव वाचू शकला नाही.

नातेवाईकांनी जर तात्काळ रुग्णालयात नेले असते तर प्रवेशचा जीव वाचला असता असे नातेवाईकांनी सांगितले. दिबई गावातील लोकांनी सावधान रहावे पावसाळ्यात साप बाहेर येतात त्यामुळे सावधगिरी बाळगावी असं वैद्यकिय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. नवरदेवाचा मृत्यू झाल्याने संपुर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. बुलंदशहरात गेल्या दोन महिन्यात साप चावल्याने सात जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here