आसाममध्ये पूरस्थिती गंभीर 26 जणांचा मृत्यू तर 1.61 लाखांहून अधिक लोक बाधित

0
7

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. करीमगंज जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून 1,52,133 लोक बाधित झाले आहेत. जवळपास 1378.64 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर, 54,877 जनावरांना त्याचा फटका बसला आहे. 28 मे पासून आसाममध्ये सुरू असलेल्या पूर, पाऊस आणि वादळी परिस्थीतीमुळे आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. 15 जिल्ह्यांमध्ये 1.61 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत.

आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 1,52,133 लोक पुरात पाण्याखाली अडकून करीमगंज हा सर्वात जास्त प्रभावित जिल्हा राहिला. एकूण 5114 बाधित लोकांनी 43 छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. कांपूर येथील कपिली नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बंधारे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे.

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये बिस्वनाथ लखीमपूर, होजई, बोंगाईगाव, नलबारी, तामुलपूर, उदलगुरी, दररंग, धेमाजी, हैलाकांडी, करीमगंज, हैलाकांडी, गोलपारा, नागाव, चिरांग आणि कोक्राझार यांचा समावेश आहे.