अलीकडेच खाजगी दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio ने त्यांचे रिचार्ज प्लॅन वाढवले आहेत. त्यानंतर लोक BSNL कडे वळू लागले आहेत. एवढेच नाही तर Airtel आणि Jio वापरकर्ते त्यांचे मोबाईल नंबर BSNL वर पोर्ट करत आहेत.
सोशल मीडियावरही यासंदर्भात अनेक ट्रेंड सुरू आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि BSNL यांच्यात 15 हजार कोटी रुपयांचा करार झाल्याचे वृत्त आहे. TCS आणि BSNL मिळून भारतातील 1000 गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात लोकांना स्वस्तात हायस्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे.
सध्या 4G इंटरनेट सेवेवर जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व आहे, परंतु जर बीएसएनएल मजबूत झाले तर ते जिओ आणि एअरटेलच्या अडचणी वाढवू शकतात. टाटा भारतातील सुमारे चार क्षेत्रांमध्ये डेटा केंद्रे बांधत आहे. ज्यामुळे भारतातील 4G पायाभूत सुविधा मजबूत करण्यात मदत होईल. BSNL ने देशभरात 9000 पेक्षा जास्त 4G नेटवर्क स्थापित केले आहेत. ते एक लाखापर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.
जिओ-एअरटेलने रिचार्ज वाढवले
जून महिन्यात जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर Airtel आणि Vi ने देखील त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. जिओ आणि एअरटेलच्या वाढलेल्या किमती 3 जुलैपासून लागू झाल्या, तर Vi च्या वाढलेल्या किमती 4 जुलैपासून लागू झाल्या. जिओने सर्वाधिक किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने एकाच वेळी 12 ते 25 टक्क्यांनी दर वाढवले आहेत.
एअरटेलने 11 ते 21 टक्के आणि Vi ने 10 ते 21 टक्क्यांनी किंमत वाढवली आहे. जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ झाल्याबद्दल लोकांचा संताप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोक आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत.