सांगली : सांगली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज दिनांक २४ रोजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आटपाडीचे जि.प. सदस्य अरुण बालटे यांनी ग्रामविकास विभागाची झाडाझडती घेत अनेक प्रश्न उपस्थित केले.
ग्रामपंचायत विभागाकडील अनेक कामे प्रलंबित असून यास जबाबदार कोण? जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तर मागील सभेमध्ये घेतलेले विषय चालू सभेमध्ये घेत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यात मॉडेलस्कूल बाबत प्रशासन दुजाभाव करीत असल्याचे सांगत आटपाडी येथील जि.प. प्राथमिक शाळा १ व २ नंबर या शेजारी-शेजारी असताना फक्त १ नंबर शाळाचा समावेश मॉडेलस्कूल मध्ये केला असल्याने त्या ठिकाणी कामे सुरु आहेत. परंतु त्याच शेजारी असणाऱ्या शाळा क्र. २ चा समावेश हि मॉडेलस्कूल असून त्याठिकाणी हि कामे करावी जेणेकरून दोन्ही शाळांचा दर्जा सुधारणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत निंबवडे नं. २ व बनपुरी क्र. २ या ठिकाणी ही शाळामध्ये मॉडेल स्कूल मध्ये असणाऱ्या कामांचा समावेश करावा अशी मागणी केली.
आटपाडी तालुक्याचे नेते माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, माजी जि.प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली अरुण बालटे यांनी विकास कामांचा धडका लावला असून अनेक प्रलंबित कामे त्यांनी पूर्ण केली आहेत. जि.प. च्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी आतापर्यंत आक्रमकपणे अनेक विकास कामाबाबत बाजू मांडत ती कामे मार्गी लावल्याने आटपाडीकरांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस