मुंबई : सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय व वापरात असणाऱ्या (WhatsApp) या मेसेजिंग अॅपमध्ये अनेक बदल झाले, अपडेटही आले. अनेकांनी महत्वाच्या कामांमध्येसुद्धा संदेश देवाणघेवाणीसाठी (WhatsApp) लाच प्राधान्य दिले. पण, आता मात्र ही परिस्थिती काहीशी बदलणार आहे. कारण, २०२१ च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जानेवारी २०२१ काही अॅन्ड्रॉईड कार्यप्रणाली आणि आयफोन डिवाईसवर WhatsApp काम करणार नाही. iOS 9 आणि अँड्रॉईड ४.०.३ ऑपरेटिंग सिस्टम नसणाऱ्या फोनमध्ये व्हॉटसअॅप चालणार नाही. यासंदर्भातील यादीही जाहीर करण्यात आली आहे. ऑपरेटींग सिस्टीमच्या नव्या व्हर्जनचा वापर करण्याचा सल्लाही व्हॉटसअॅपकडून युजर्सना देण्यात आला आहे.
व्हॉटसअॅपचा वापर सुरु करण्यासाठी तुम्हीही फोनच्या ऑपरेटींग सिस्टीमबाबतची माहिती लगेचच करुन घ्या. असं न केल्यास नव्या वर्षातच तुम्हाला व्हॉटसअॅपपासून दूर राहावं लागणार आहे. फोन अपडेट करण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन सिस्टीम अपडेटच्या पर्यायाची निवड केल्यास ऑपरेटींग सिस्टीमचं नवं व्हर्जन अपडेट करा. व्हॉटसअॅपच्या या नव्या व्हर्जनसाठी अॅपल कंपनीच्या (iPhone 4), (iPhone 4S), (iPhone 5), (iPhone 5S), (iPhone 6) आणि (iPhone 6S) ला ऑपरेटिंग सिस्टम ९ च्या व्हर्जननं अपडेट करावं लागणार आहे. तर, (iPhone 6S), (6 Plus), (iPhone SE) हे फर्स्ट जनरेशनचे आयफोन असल्यामुळं ते iOS 14 वरून अपडेट करता येऊ शकतात.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



