मुंबई – कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन चे नियम यांचा फटका यंदाच्या शैक्षणिक वर्षाला बसला आहे. काही ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी हे वर्गही अद्याप बंद आहेत. या सर्व परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या यावर्षी होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकाचे नियोजन राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने सुरू केले असून शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत आज महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षा ह्या १५ एप्रिलनंतर सुरू होतील. तर दहावीच्या परीक्षा ह्या १ मे नंतर घेण्याबाबत नियोजन असल्याचे म्हणाल्या.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस