नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांनी पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनचा पर्याय निवडण्यात आला आहे. यादरम्यान गेल्या २४ तासात देशात ४० हजार ९५३ नवे कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय २३ हजार ६५३ जण उपचारानंतर बरे झाले असून १८८ मृत्यूंची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या देशात २ लाख ८८ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या १ लाख ५९ हजार ५५८ इतकी आहे. देशभरात आतापर्यंत ४ कोटी २० लाख ६३ हजार ३९२ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस