आटपाडी : दिघंची ता. आटपाडी जि. सांगली येथील दिघंची-मायणी रोडवर दिघंचीपासून अंदाजे ५ ते ६ किमी अंतरावर झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील दिघंची मायणी रोडवरती कुर्डूवाडी ता. माढा, जि. सोलापूर येथील रहिवाशी असणारे मेहर कुटुंबीय हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या नातेवाईकाकडे निघाले होते. दिघंची पासून अंदाजे ५ ते ६ किमी अंतरावर त्यांची गाडी गेली असता याठिकाणी त्यांच्या गाडीच्या आडवी जनावर आल्याने त्याला वाचविण्यासाठी गाडी बाजूला घेताना गाडीला अपघात झाला. गाडी रस्त्याच्या कडेला गेल्याने गाडीने दोन-तीन पलट्या खावून गाडी साईडला पडली.
यावेळी गाडीत असणाऱ्या छाया अंकुश मेहर या गंभीर जखमी झाल्याने त्यांना आटपाडी येथील ग्रामीण रूग्णामध्ये पुढील उपचारासाठी आणले जात असताना त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती अंकुश मेहर व मुले हे जखमी झाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस