मुंबई : देशावर कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत पुढे असणाऱ्या महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे, राज्यातही पुन्हा लॉकडाऊन केलं जाऊ शकतं, असे संकेत छगन भुजबळांनी यांनी दिले आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील रूग्णांची संख्या वाढत असली तर लॉकडाऊनचा विचार सरकारनं केलेला नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, यानंतर आज छगन भुजबळ यांनी लॉकडाऊनसंदर्भातील संकेत दिले आहेत. छगन भुजबळ म्हणाले, की राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येईल. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन भुजबळ यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे. यासोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात शुक्रवारी 24 तासांत 9 हजार 309 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात महाराष्ट्र आणि केरळमधील परिस्थिती गंभीर आहे. या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना प्रकरणं आढळत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 20 लाख 52 हजार 905 रुग्णांची नोंद झाली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
