गृहमंत्री देशमुखांची चौकशी होणार का?; फडणवीसांचा पवारांना सवाल
नागपूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी करण्यात यावी अशी मागणी पवार यांनी केली आहे. या प्रकरणात केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार की गृहमंत्र्यांचीही चौकशी होणार आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जोपर्यंत देशमुख यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहिल असा इशाराही त्यांनी दिला.
दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन थेट पवारांनाच सवाल केले आहेत. ज्युलिओ रिबेरो चांगले अधिकारी आहेत. हे हुशार आहेत. पण अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डीजी रँकचे अधिकारी गृहमंत्र्यांची चौकशी कशी करणार? असा सवाल करतानाच केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार आहे की देशमुख यांचीही चौकशी होणार आहे. त्याचा खुलासा पवारांनी करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस