नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर नाना पटोले प्रथमच नागपुरात दाखल झाले. यावेळी बोलताना त्यांनी मोदींच्या विरोधात वाराणसीतून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य केले आहे.

पक्षाने आदेश दिला तर आपण वाराणसीमधून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. याआधी नाना पटोलेंनी भाजपमध्ये असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनच खासदारकीचा राजीनामा दिला होता. पंतप्रधान मोदींच्या मागील कार्यकाळात राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले होते.
कृषी कायद्यावरून देखील नाना पटोलेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकारनं लागू केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय सुरु असलले शेतकऱ्यांचे आंदोलन संपणार नाही, असा इशाराच पटोलेंनी दिला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
