मुंबई : राज्यभरातील कॉलेज लवकरच सुरु करण्याच्या तयारीत उच्च शिक्षण विभाग आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात संकेत दिले आहे. कॉलेजेस कधी सुरू होणार ? या प्रश्नावर त्यांनी तारीख २ दिवसांत जाहीर केली जाईल अशी माहिती दिली.राज्यातली महाविद्यालयं सुरू करण्यासाठी एसओपी ठरवण्यासाठी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक पार पडली. युजीसीच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत मार्गदर्शक तत्त्व ठरवून टप्प्याटप्प्याने कॉलेजेस सुरू करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झाली.
दोन दिवसांत आता तारीख जाहीर केली जाईल असे उदय सामंत यांनी बैठकीनंतर सांगितले. कोरोना काळात कॉलेज विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा उपयोग क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आला होता. आता ही वसतीगृह सॅनिटाईज करण्यात येत आहेत. कॉलेज सुरु होण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय दोन दिवसात कळण्याची शक्यता आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
