आटपाडी : सध्या राज्य सरकारचे अधिवेशन सुरु असून विधान परिषदेमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेवरून आमदार गोपीचंद पडळकर हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत राज्यसरकारला जाब देखील विचारला आहे.
विधानपरिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चामध्ये सहभागी होत आमदार पडळकर यांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या सर्व्हेचे टेंडर वरून सरकारला धारेवर धरले आहे. सदरच्या पाणी योजनेच्या सर्व्हेचे टेंडर हे त्या-त्या जिल्ह्याला करणे अपेक्षित आहे. मात्र एकूण ६ ते ७ जिल्ह्याचे मिळून एकच टेंडर काढण्यात आले आहे.
जर हे पाणी योजनेच्या सर्व्हेचे टेंडर हे जिल्ह्यानिहाय काढले असते तर सुशिक्षित बेराजगार यांना काही प्रमाणात रोजगार मिळाला असता. परंतु सरकारने चुकीच्या पद्धतीने पैसे खर्च केल्याचा आरोप हि आमदार पडळकर यांनी सरकारवर केला आहे. तर सरकारने या पाणी योजनेच्या सर्व्हेचे टेंडर एकाच कंपनीला दिल्याने हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा रोजगार सरकारने हिसकावून घेतला असल्याचे त्यांनी सभापतींच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस