मुंबई : शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी परवानगी का नाही ? असा सवाल करत शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नेते राम कदम यांनी पत्राद्वारे केली आहे.
शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय ही शरमेची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का ?, असा सवाल राम कदम यांनी केला आहे. सोबतच, गेल्या काही दिवसात सातत्याने हिंदूंची गळचेपी होत असल्याची टीका देखील राम कदम यांनी केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
