सांगली : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य कर्मचारी गोरखनाथ चंदणशिवे यांना सिरमची कोव्हीशिल्ड ही पहिली लस देण्यात आली.
कोरोनाची प्रथम लस घेणारे गोरखनाथ चंदणशिवे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कोरोनाची कोव्हिशिल्ड ही लस पुर्णपणे सुरक्षीत असून गेल्या एक तासापासून मला कोणताही त्रास जाणवला नाही. कोरोना लस घेऊन कोरोना मुक्त व्हावे. आपण सुरक्षित तर आपला देश सुरक्षित असे ते म्हणाले.
कोरोना लस घेणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लवी जाधव म्हणाल्या, कोरोनाचा समुळ नाश करण्यासाठी कोरोना लस घेणे आवश्यक आहे. मी ही लस घेतली असून या लसीचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. ही लस पुर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन मी करीत आहे.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस
