मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी असावेत,” तसेच राज्यातील महिला या मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाहीयेत. वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी. अशी आग्रही मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
“या प्रकरणात समोर आलेल्या ऑडिओ क्लीप ताब्यात घेतल्या पाहिजेत. त्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवून तो आवाज कोणाचा आहे?, हे तपासले पाहिजे. लॅपटॉपही स्कॅन केला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या सर्व तपासाच्या गोष्टी असून, गुन्हेगारांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

भातखळकर यांनी शिवसेनेचे खासदर संजय राऊत यांच्यावरही घणाघाती टीका केली. “माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्यावर आरोप झाले तेव्हा संजय राऊतांनी अग्रलेख लिहिले. त्यानंतर भाजपने त्यांचा राजीनामा घेतला. आता संजय राऊत कुठे गेले आहेत? हा त्यांचा दुतोंडीपणा आहे,” असे भातखळकर म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
