नाशिक : “IAS तुकाराम मुंढे जेव्हा आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा त्या फाईली वर आल्या असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.तर यापुढे फाईली ढगात जाणार नाहीत. महाराष्ट्रात वातावरण बदलतंय. नाशिकचं वातावरण बदललं की महाराष्ट्रातलं वातावरण बदलतं. अनेक जुने सहकारी पुन्हा पक्षात आले.
देशासाठी बलिदान देण्याची नाशिकला मोठी परंपरा आहे. निवडणुका येतात जातात. निवडणुका येतात म्हणून आपण काम करतो असं नाही. आपल्या रक्तात सामाजिक कार्य आहे. शिवसेनेची ती परंपरा आहे. त्यामुळेच लोक आपल्यामागे उभे राहतात”.
आम्हीही नाशिकपासून कामाला सुरुवात केली आहे, असं सांगतानाच कुणी कितीही वल्गाना केल्या तरी नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल. मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल”, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
