कोल्हापूर : गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर केलंय.गोपीचंद पडळकर यांची लायकी काय हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलं आहे. मागच्या वेळी जेव्हा त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती त्यावेळी त्या गोप्या पडळकर बद्दल मी माझे मत व्यक्त केले होते.

लायकी नसणारी माणसं बोलतायत , या सगळ्याचा बोलवता धनी हा वेगळा असावा, या सगळ्याचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीस आहेत हे मला आता ठामपणे वाटायला लागले आहे, कारण ते ज्या भाषेत टीका करतात यावरून यांचा बोलवता धनी फडणवीस असल्याचं समोर आलं. शरद पवार साहेब यांच्या सारख्या नेत्यांवर कसे आरोप करताय? पवार साहेब यांच्यावर टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत आणि पडळकर यांची लायकी काय?देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांना रोखण्याची गरज आहे.नाहीतर याचे परिणाम पाहायला मिळतील.असा इशारा देखील मुश्रीफ यांनी दिलाय.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
