मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सायंकाळी चार वाजता महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा, मनसुख हिरन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएनं केलेली अटक आणि त्यामुळं राज्य सरकारपुढं निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्यामुळं शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय? ते कोणती नवी खेळी करण्याच्या तयारीत आहेत? या चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं सरकारवर आरोप सुरू आहेत. भाजपचं लक्ष्य शिवसेना असली तरी गृहखाते अनिल देशमुख यांच्याकडं असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसही सावध झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवारांनी बैठक बोलावली आहे. राज्य सरकारच्या कारभारात केंद्राचा हस्तक्षेप सातत्यानं वाढत असल्याचा राज्य सरकारचा सुरुवातीपासूनच आरोप आहे. स्फोटकं प्रकरण ‘एनआयए’नं हाती घेतल्यामुळं महाविकास आघाडीची ती भावना अधिकच बळकट झाली आहे. त्यामुळं आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते? याविषयी उत्सुकता आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस