मुंबई : औरंगाबाद शहराचे संभाजीनगर या नामांतराच्या वादावरून सध्या राजकारण तापू लागले आहे. काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला जाहीर विरोध केला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या अमंलबजावनीशी बांधील आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध केला म्हणून शिवसेना शिवसनेने आपली भूमिका बदलली नसल्याचे जाहीर करत भाजपाने उगाच वळवळ करू नये, अशा शब्दात नामांतराच्या मुद्यावरून भाजपाला दैनिक सामनाच्या अग्रलेखातून धारेवर धरले आहे.
औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. मात्र, काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही, जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मुर्खपणाचे लक्षण असल्याचा टोला भाजपला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी उत्तरेतील शहरांच्या नामांतराचे दाखले देत औरंगाबादच्या नामांतरांवरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपाचा जो ज्ञानरथ अलीकडच्या काळात उधळला आहे. त्या रथाचे पुढचे चाक म्हणजे चंद्रकांत पाटील आहेत, असा टोला लगावत शिवसेनेने उत्तर भारतातील शहराची नावे बदलली जात होती. त्याच वेळी महाराष्ट्रात सत्तेत असताना तुम्ही औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर का केले नाही? असा सवाल शिवसेनेने केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस