म्हसवड : म्हसवड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी धनाजी रामचंद्र माने यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल येथील राष्ट्रीय अपंग महासंघातर्फे म्हसवड शहराध्यक्ष फक्रुद्दीन काबील मुल्ला यांचेतर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष माने म्हणाले अपंगाचे हक्क व त्याच्यासाठी असणाऱ्या अपंगकल्याण योजना यांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहिन व त्यांना माझे सतत सहकार्य राहील याप्रसंगी प्रशांत ढवण, अमोल सादिगले, सचिन डमकले, बाळासाहेब विरकर आदी राष्ट्रीय अपंग महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
