नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी नुकतेच महिलांनी जीन्स घालण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. यानंतर आता मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या उषा ठाकुर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकुर या मध्य प्रदेश सरकारमध्ये पर्यटन तसेच संस्कृतिक मंत्री आहे.
सोमवारी राज्याची राजधानी असणाऱ्या भोपाळमध्ये एका मुलाखतीदरम्यान ठाकूर यांना कपड्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ठाकुर यांनी, माझं व्यक्तीगत मत तर हे आहे की फाटके कपडे घालणं हे भारतीय संस्कृतीप्रमाणे अपशकून मानलं जातं. ठाकुर या भोपाळमधील एका संग्रहलयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाटी आल्या होत्या. “तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल की आपली आजीसुद्धा कापड थोडं तरी फाटलं असेल तर ते वापरु नको असं सांगायची. आईसुद्धा कापड थोडं फाटलं तरी आता हे वापरणं बंद कर, असा सल्ला द्यायची,” असा संदर्भही ठाकुर यांनी दिला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस