मुंबई : कृषी कायद्यावरून केंद्रावर निशाणा साधताना, सध्या देशाचं सरकार मूठभर लोक चालवत असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे. देशाचे सरकार काही मूठभर लोक चालवत असून, देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांची संख्या यांच्यापेक्षा जास्त होती, त्यांनाही पायउतार व्हावं लागलं, त्यामुळं केंद्रातील सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात नाना पटोलेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला ईव्हीएमवर विश्वास असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना पटोले म्हणाले की, मला जर बॅलेट वरती मतदान करायचं असेल तर तो माझा अधिकार आहे. त्यांना जर ईव्हीएम मशीन वरती मतदान करायचं असेल तर तो त्यांचा अधिकर आहे. ज्याला ज्यावर मतदान करायचं त्याचा तो अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
