पणजी : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र “धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही. या प्रकरणी चौकशी होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे,”असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पणजी येथे म्हटलं आहे.
संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून शरद पवार सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी पणजी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं.
त्यावर शरद पवार म्हणाले, “काही जणांचा बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे. या प्रकरणाची वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य काय ते बाहेर येऊ द्या. मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही जबाबदार आहोत.”
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
