मुंबई : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नोकर भरतीबाबत ट्विटरवर मोठी घोषणा केली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
दरम्यान, ही भरती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील म्हणजेच एसईबीसी उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50 टक्के नियुक्ती देण्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
