आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीमधील ३३ प्रभागातील ८८ जागेसाठी आज मतदान होत असून प्रशासनाची निवडणुकीबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. शेटफळे गावामध्ये काही प्रभागात चौरंगी, तिरंगी लढती होत असल्याने हे गावे संवेदनशील असून यामध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पहिल्या टप्यात एकूण १० ग्रामपंचायतीपैकी पात्रेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून बाकीच्या विठ्ठलापूर, घरनिकी, धावडवाडी. पात्रेवाडी, देशमुखवाडी, शेटफळे, बोंबेवाडी, तळेवाडी, लेंगरेवाडी, माडगुळे या ग्रामपंतीसाठी आज मतदान सुरु झाले आहे. यातील बोंबेवाडी व धावडवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी प्रभागासाठी निवडणूक होत आहे.
तहसीलदार सचिन लंगुटे, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, निवडणूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आज होणाऱ्या निवडणुकीसाठी योग्य नियोजन केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
