नवी दिल्ली : बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ५१ शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या इश्वरीपूर येथील प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिराला भेट दिली. नियोजित दौऱ्यानुसार मोदी सकाळी अकराच्या सुमारास या मंदिरामध्ये पोहचले. मोदींच्या हस्ते देवीची पुजा करण्यात आली. यानंतर बोलताना मोदींनी आपण देवीकडे संपूर्ण मानवजातीला कोरोनापासून मुक्ती द्यावी अशी प्रार्थना केल्याचं सांगितलं.
आज मानवजात कोरोनामुळे ज्या संकटांमधून जात आहे. तर माझी देवीकडे हीच प्रार्थना आहे की संपूर्ण मानवजातील या कोरोना संकटातून लवकरात लवकर मुक्त करावं. सर्वे भवंतु सुखिनः जे मंत्र आपण जगत आलोय. वसुदैव कुटुंबकम हे आपले संस्कार असल्याने मी संपूर्ण मानवजातीसाठी प्रार्थना करतो,” असं मोदी म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस