मुंबई : वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल बरोबर २४ जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती वरूणचे काका अनिल धवन यांनी दिली.
२४ जानेवारीला हे दोघे अलिबागला लग्नगाठ बांधणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अलिबागमधील पंचतारांकित हॉटेलची बुकींग झाल्याचीही माहिती आहे. या विवाहसोहळ्यासाठी २०० पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अॅडव्हान्स बुकींगपासूनचे सर्व व्यवहारही पूर्ण झाले आहेत. मागील बऱ्याच काळापासून नताशा आणि वरुण रिलेशनशिपमध्ये आहेत. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्येच ते विवाहबंधनात अडकले जाणार असल्याची चर्चा होती. पण, कोरोनाच्या संकटामुळे शक्य झाले नाही.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस