मुंबई: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर अजब विधान केलं आहे. ज्यांच्या घरातील व्यक्ती आत्महत्या करते त्यांना चिंता असते. इतरांनी चिंता करण्याची गरज नाही, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी चर्चा करताना हे विधान केलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणी कुणी तरी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. तक्रार करणारे हे तिचे नातेवाईक असले पाहिजेत. तिचं शोषण झालं की नाही? नेमकं काय झालं? हा काय प्रकार आहे? एकूण घटनेचं गांभीर्य काय आहे? हे पाहिलं पाहिजे. तसेच ज्या घरातील व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्ती आत्महत्या करते. त्या घरातील व्यक्तीला चिंता असते. इतरांना चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.
परंतु, केवळ राजकारणासाठी हा विषय घेऊन जायचं असेल तर मग चौकशी अंती जे होईल सिद्ध होईल ते होईल. त्यानुसार कारवाई होईल, असं सांगत पण या मुद्द्यावर एखाद्याची प्रतिमा खराब करण्यासाठी एखादी राजकीय भूमिका घेऊन वक्तव्य केलं जात असेल तर ते योग्य नाही, ही माझी भूमिका आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
