मुंबई : आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाबद्दल मदत आणि पुनर्वसन, आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवारांना माहितीच नसल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करत सांगितले.
विजय वडेट्टीवारांच्या ट्विटनंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात असून, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या प्रकरणावरून वडेट्टीवारांवर निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार तुमचा सचिव जर तुमचं ऐकत नसेल तर तुमचं त्या खुर्चीवर कामचं काय?, सचिवाला मंत्री बनवा तुम्ही राजीनामा देऊन टाका ही तकलादू कारण देऊन जनतेला येडं बनवू नका महाराष्ट्राच्या भविष्याशी खेळताय हे लक्षात ठेवा ही तरूणाई तुम्हाला कधी माफ करणार नाही, असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी वडेट्टीवारांवर बोचरी टीका केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस