मुंबई : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असून यासाठी महाराष्ट्रही लसीकरणासाठी सज्ज झाला असून राज्यात जय्यत तयारी केली जात आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोना लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकार लसीची उपलब्धता करून दिल्यानंतर लगेचच आम्ही लसीकरणाला सुरुवात करु. यासाठी कोल्ड चेन सुद्धा तयार आहे. काही कमतरता असेल तर ती दूर करु,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
