करगणी : करगणी पशू वैद्यकीय अधिकारी यांनी आज दिनांक १२/०२/२०२१ पासून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण मोहिमअंतर्गत हिवतड येथून लसीकरण व “ear tag” चालू केले आहे.
सदर विषयाबाबत आमचे प्रतिनिधी नंदकुमार कोळी यांनी करगणी व परिसरातील शेतकरी व पशुपालक यांच्या भेटी घेऊन या योजने विषयी माहिती घेतली असता असे लक्षात आले की, राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण मोहिमे अंतर्गत बरेच पशुधन हे लसीकरण व टॅगिंग पासून वंचित राहिले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग व पशुपालन यांच्याकडून लसीकरण व टॅगिंग करण्याची मागणी होत आहे.
याबाबत करगणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी “डॉ.पाटील” यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी लवकरच लसीकरण सुरू करणार असल्याची माहिती दिली होती. यामध्ये एकूण ११ गावे आहेत व २०१२ च्या सर्व्हेनुसार पशुधन हे १४००० आहे त्यापैकी १०५०० पशुधन हे लसीकरण करून पूर्ण केले आहे व बाकी राहिलेले पशुधन यांना लवकरच लसीकरण व टॅगिंग सुरु आहे. तसेच ज्यांचे लसीकरण व टॅगिंग राहिले आहेत त्या पशुपालक यांनी या योजनेचा फायदा घेवून आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.
डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शन खाली करगणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी हरिदास खूपसे, औदुंबर चौगुले व ओम डिघोळे या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात लसीकरण मोहिमेला सुरवात केली असून जे कोणी लसीकरण व tag साठी बाकी राहिले असतील त्यांनी संपर्क साधून जनावरांना लसीकरण व टॅगिंगकरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस