पुणे : राज्यातील कोरोना स्थिती व लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांनी लोकांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी केवळ शनिवार आणि रविवारच्या मिनी लॉकडाऊन संदर्भात चर्चा केली होती. मात्र, प्रत्यक्षात कडक लॉकडाऊनची अधिसूचना प्रसिद्ध केली. ही फसवणूक आहे. भाजप व सर्वसामान्य जनता हे सहन करणार नाही,’ असं पाटील म्हणाले.
‘राज्यातल्या अनेक व्यापारी संघटनांचे मला फोन आले आहेत. अटक झाली तरी दुकाने सुरू ठेवणार, अशी त्यांची भूमिका आहे. कोरोनाची नियमावली तयार करताना सर्वसामान्य माणूस कसा जगेल हे सुद्धा बघितले पाहिजे. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही मात्र सर्वसामान्य व्यक्तींना पॅकेज द्या. घरकाम, फेरीवाले यांना पॅकेज द्या, अशी आमची भूमिका होती. मात्र, सरकार एक रुपयाचेही सुद्धा पॅकेज द्यायला तयार नाही. पॅकेज राहिले बाजूला, मिनी लॉकडाऊन करू असे सांगून कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशा प्रकारची फसवणूक राज्य चालवणाऱ्यांकडून अपेक्षित नाही, असंही ते म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस