नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नवं वळण लागलं आहे. शनिवारी रात्री आंदोलनस्थळी एका संशयित आरोपीला पकडलं होतं. त्या व्यक्तीचा नवा व्हिडीओ समोर आला असून, शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे माध्यमांशी बोललो, असा यू-टर्न आरोपीनं घेतला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट असल्याचा हा खळबळजनक प्रकार उजेडात आला होता. आंदोलन सुरू असलेल्या परिसरात पकडण्यात आलेल्या आरोपीने हत्येच्या कटाची कबूलीही दिली होती. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट आहे, असं आरोपीनं म्हटलं होतं. मात्र, आता त्यानं आपल्या विधानांवरून यू-टर्न घेतला आहे.
त्याचा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला असून, आपण शेतकऱ्यांनी जे बोलायला सांगितलं होतं. तेच बोललो. मात्र, हा व्हिडीओ अधिकृत असल्याचं अद्याप निष्पन्न झालेलं नाही. या तरुणाला सोनीपत पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
