नवी दिल्ली : क्रिकेटपटूंविरोधात आपत्तीजनक ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या असून सामाजिक तेढ निर्माण होईल, असं ट्विट न करण्याचा सल्लाही ट्विटरने कंगनाला दिला आहे.

देशात शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यावर ट्विटरवरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रिकेटपटू रोहित शर्मानेही ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावर कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यामुळे ट्विटरन कंगनाच्या या ट्विटची दखल घेऊन त्यावर कारवाई केली आहे.
ट्विटरने कंगनाच्या दोन्ही पोस्ट डिलीट केल्या आहेत. कंगनाने नियमांचा भंग केल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. कंगनाने ज्या पद्धतीने भाषेचा वापर केला आहे. ती या प्लॅटफॉर्मसाठी योग्य नाही. आमच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्विट्सवरच आम्ही कारवाई केली आहे, असं ट्विटरने म्हटलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
