मुंबई : अमेरिकन संसदेच्या आत आणि बाहेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारादरम्यान ट्विटरने ट्रम्प यांचे ऑफिशियल अकाउंट कायमसाठी ब्लॉक केले आहे. यानंतर ट्रम्प यांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत अकाउंट @POTUS वरून एक पोस्ट केली होती. मात्र ट्विटरने काही सेकंदातच ही पोस्ट डिलीट केली.
ट्विटरने ट्रम्प यांचे पर्सनल अकाउंट कायमचे निलंबित केले आहे. भविष्यात हिंसाचाराचा धोका पाहता हा निर्णय घेतल्याचे ट्विटरने सांगितले. ट्विटरने म्हटले की, ‘ट्रम्प यांच्या अकाउंटवरील पोस्टचा अलिकडेच आढावा घेतला. यानंतर धोक पाहता आम्ही त्यांचे अकाउंट निलंबित करण्याचा निर्णय घेतला.’ दरम्यान जर ट्रम्प यांनी भविष्यात नियम मोडले तर त्यांचे खाते कायमचे बंद केले जाऊ शकते, असा इशाराही ट्विटरने याआधी दिला होता.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
