जळगाव : शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील पहिले आमदार अशी हरीभाऊ आत्माराम महाजन यांची ओळख होती. त्यांचे काल रात्री एक वाजताच्या सुमारास निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. हरीभाऊ महाजन यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हरीभाऊ आत्माराम महाजन यांना श्रद्धांजली अर्पण केली. “जळगाव जिल्ह्यातील धरणगाव मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ महाजन यांचे दुःखद निधन झाले. मतदारसंघाच्या विकासासाठी हरिभाऊ महाजन यांचे मोलाचे योगदान होते. शिवसेनेत असतांना ते माझे सहकारी आमदार होते. मी शिवसेनेमधून बाहेर पडलो तेव्हा ते भक्कमपणे माझ्यासोबत होते. त्यांच्या निधनाने एक धडाडीचे आणि सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपले आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत आमदार महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !”
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
