आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाच्या विमा काढण्यास प्राधान्य देवून विमा काढण्याचे आवाहन माजी समाजकल्याण सभापती व विद्यमान जि.प. सदस्य ब्रम्हदेव पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील व्यापाऱ्यांना करगणी येथील झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केले.
करगणी ता. आटपाडी येथील आटपाडी -भिवघाट रस्त्यालगत असलेल्या अरुण पांढरे, दिलीप सरगर, नानासो पांढरे, पांडुरंग सरगर सूर्यवंशी भांडी सेंटर, अशोक पत्की यांचे पंढरपुरी चहाचे दुकान आगीत खाक होवून व्यापाऱ्यांचे अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागलेल्या ठिकाणी त्यांनी पहाणी करून आटपाडी तहसीलदार कार्यालयात बैठक घेतली.
यावेळी सभापती डॉ. भूमिका बेरगळ, उपसभापती दादासो मरगळे, विष्णू अर्जुन यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ब्रम्हदेव पडळकर म्हणाले, आगी सारख्या तसेच भविष्यात कोणत्याही दुर्घटनेपासून आपल्या व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी विमा काढण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तसेच त्यांनी तहसीलदार यांच्याशी बोलून नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाच्या वतीने मदत करण्याचे आवाहन करत तातडीने पंचनामे करून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस