• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस : नारीशक्तीच्या वेगवेगळ्या रूपांना सलाम

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन by माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन
March 8, 2021
in Uncategorized
0
आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस : नारीशक्तीच्या वेगवेगळ्या रूपांना सलाम
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

ती शेतात राबणारी, मैदानात खेळणारी, अडथळे ओलांडत चालणारी ती. कधी घर सांभाळणारी तर कधी गावगाडा चालवणारी, कधी प्रश्न विचारणारी तर कधी खळखळून हसणारी ती. नारीशक्तीच्या अशा वेगवेगळ्या रूपांना सलाम करणारा आजचा दिवस- म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस.

मला एक प्रश्न पडतो, महिलेसाठी कोणता एक दिवस का आहे???? पुरुषांसाठी का असा कोणता पुरुष दिवस नाही????
तुम्हालाही पडला असेलच ना कधी मधी…..पण मला जसजशी स्त्री कळायला लागली तेव्हा समजले की स्त्री जे करू शकते ते पुरुष कधीच नाही करू शकत , म्हणून स्त्री या दिनास पात्र सुद्धा आहे. पण गम्मत माहिती आहे काय आहे, महिला दिन असतो हेच काही महिलांना माहीत नाही. हा खरं तर संशोधनाचा विषय असायला पाहिजे असो…..

आज कोणी आपल्या आईला, कोणी आपल्या ताईला ,कोणी आपल्या काकी ला, कोणी मामी ला, कोणी भावजयीला आणि कोणी आपल्या नात्यातील प्रत्येक स्त्रीला काहीतरी उपहार देतील , फुल देतील, वचन देतील, बाहेर जेवायला नेतील…..आज प्रत्येक जनांच्या स्टेटस ला आई दिसेल जे दोनच वेळा स्टेटस ला दिसते. एक म्हणजे आईचा वाढदिवस असताना, आणि दुसरे म्हणजे महिला दिन असतांना…. जिच्यामुळे तुमचे स्टेटस आहे, तुम्ही त्यांना वगळून दर्द भरे गाणे स्टेटस ला ठेवता, आणि जिच्यासाठी ठेवता तीला तुमच्या मोबाईल च्या नाही, पैशाच्याच स्टेटस शी घेणेदेणे असते.. आईलाच काय तर कोणत्याच स्त्रीला तुम्ही महागडे उपहार द्यावे, फुल द्यावे, बाहेर जेवायला न्यावे असे कधीच वाटत नाही. हा पण रोज, आई ग जेवलीस का?, ताई कशी आहेस?? असे मनाला दिलासा देणारे प्रश्न जरी विचारले तरी पुरे आहे .

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बॅंका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

इटलीमध्ये या दिवशी ; पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात.महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.

असे असले तरी तिच्या’ वाटय़ाला आलेले अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेलेच आहे. हे मळभ हटवण्यासाठी तिचा निकराचा लढा सुरूच आहे. अनेक क्षेत्रात तळपती समशेर बनून ती आपल्या शत्रूंशी लढत आहे. हे शत्रू किती आहेत याची गिनती करणे सोपे आहे, पण ते कोण आहेत हे ओळखणे अवघड आहे. जगातल्या सर्वात सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या गळला नख लावण्याचे दुष्टकार्य केले जाते तेही ‘जन्मदात’ आईबापाच्या संमतीने आणि आजी-आजोबा, आत्या, मामा यांच्या साक्षीने. कदाचित आईच्या मनाविरूद्ध ते घडत असेल. आपल्या गर्भाच्या मृत्यूबरोबर (की हत्या?) मातृप्रेमाच, वात्सल्याच्याही चिंधडय़ा उडवल्या जाताना तिला पाहावे लागते.

तिच्या डोळ्यातल्या अंगाराला कायद्याचे कवच लाभले तर दुष्कर्मे करणारे क्रूरकर्मा निश्चितच पुढे येण्यास कचरतील. ज्ञानदेव म्हणतात की, ‘स्त्री-पुरूषन्नामभेदे। शिवपण एकले नांदे।’ म्हणजे शिवशक्तींचे स्वरूप वरून जरी दोन दिसत असले तरी त्यांचे तत्त्व एकच आहे. स्त्री-पुरूष समानता याच्यापेक्षा सोप्या व वेगळ्या शब्दात सांगता येणार नाही. अर्थात हा विचार समाजात रूजायला आणखी किती दिवस लागतील, हे सांगता येत नाही.

महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभिर्य जास्त असते. समान वयाचा मुलगा आणि मुलगी यांचे बारकाईने निरीक्षण केल्यास मुलगी अधिक परिपक्व असते हे लक्षात येते. मुलगे हे चंचल असतात आणि मुलींना लहानपणापासून जीवनाकडे गंभीरपणे बघण्याचे आणि जबाबदारीच्या जाणीवेने वागण्याचे शिक्षण दिलेले असते. मुलगी ही उद्याची माता असते. म्हणून तिला तुझ्या हाती पाळण्याची दोरी आहे हे विसरू नकोस असे सांगितले जाते. त्यामुळे आपल्याला पुढे चालून कुटुंबाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडायची आहे अशी एक सूक्ष्म जाणीव प्रत्येक मुलीमध्ये असते आणि या जाणीवेमुळेच तिच्यात आपोआपच चांगले व्यवस्थापन कौशल्य विकसित झालेले असते. जगातल्या अनेक उद्योगांमध्ये पुरुष आणि महिलांमधला फरक अनेकांनी अनुभवलेला आहे.

महिलांचे व्यवस्थापन कौशल्य पुरुषांपेक्षा सरस असते हे विशेषत्त्वाने पुरुषांनी मान्य केलेले आहे. ती सगळ्याच गोष्टींकडे गांभिर्याने पहात असल्यामुळे ते गांभिर्य पुढच्या पिढीत उतरवण्याचे दायित्व आपल्यावर आहे हीही जाणीव तिच्या मनामध्ये सतत जागती असते. अशा सगळ्या गुणांनी मंडित असलेल्या महिलांकडे आणि मुलींकडे पुरुष मात्र हीनत्वाच्या भावनेने बघत असतात. त्यांचा हा दृष्टिकोन सुधारावा आणि त्यांच्या मनात स्त्री जातीविषयी विश्वाडस निर्माण व्हावा यासाठी सार्याल जगात आज जागतिक महिला दिन पाळला जातो. म्हणून आजच्या माझ्या भगिनींना सांगावेसे वाटते की,

हरू नकोस तू तर ढाल आहेस
रडू नकोस तू तर अंगार आहेस
शब्दाविनाही वाचा फोडणारी
तू तर आई सावित्री आहेस……

तिच्या ‘अर्ध्या आभाळा’तला श्रद्धेचा, विश्वासाचा सूर्य कधीच मावळणार हीच अपेक्षा ठेवत या जागतिक महिला दिनानिमित्त तिला शुभेच्छा!!

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

आटपाडी तालुक्यातील घरफोडी करणारा आरोपी जेरबंद ; २ लाख ८९ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

Next Post

“मी असली कोब्रा, दंश केला तर तुमचा फोटो घरात लागेल” : मिथुन चक्रवर्ती

Next Post
“मी असली कोब्रा, दंश केला तर तुमचा फोटो घरात लागेल” : मिथुन चक्रवर्ती

“मी असली कोब्रा, दंश केला तर तुमचा फोटो घरात लागेल” : मिथुन चक्रवर्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 311,999

ताज्या बातम्या

IPL 2021 : RR vs PBKS T20 ; दीपक हुडाची फटकेबाजी ; राहुल ची तुफानी खेळी ; राजस्थान समोर पंजाबचे तगडे आवाहन

IPL 2021 : RR vs PBKS T20 ; दीपक हुडाची फटकेबाजी ; राहुल ची तुफानी खेळी ; राजस्थान समोर पंजाबचे तगडे आवाहन

April 12, 2021
होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन :  जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल ; प्रशासन गंभीर

होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन : जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल ; प्रशासन गंभीर

April 12, 2021
सांगली जिल्ह्यात रेमडेसिव्हरच्या थेट विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; कोवीड हॉस्पिटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक

सांगली जिल्ह्यात रेमडेसिव्हरच्या थेट विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; कोवीड हॉस्पिटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक

April 12, 2021
चिंता वाढली : देशात कोरोनाचे दीड लाखावर नवीन रुग्ण

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे २२ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

April 12, 2021
“खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही” : संजय राऊत

अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, पण…

April 12, 2021
BIG BREAKING : दहावी, बारावीची परीक्षा लांबणीवर ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

BIG BREAKING : दहावी, बारावीची परीक्षा लांबणीवर ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

April 12, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143