मुंबई : प्रत्येक तरुण आणि तरुणींच्या मनात घर करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत सारखा एक उमदा स्टार काही महिन्यांपूर्वी या जगाला अलविदा म्हणत निघून गेला. 34 वर्षीय सुशांतने आत्महत्या केली होती.त्याच्या अकाली जाण्याने बॉलिवूडसह अख्ख्या देशाला मोठा धक्का बसला होता. पण त्याच्या खास चाहत्यांच्या मनात तो आजही जिवंत आहे. त्याचे चाहत्यांच्या मनातील स्थान अढळ आहे आणि राहील. आज सुशांतचा वाढदिवस म्हटल्यावर चाहते अक्षरश: भावूक झालेत.
सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्ती हिने सुशांत सोबतचे अनेक फोटो शेअर करत, त्याच्या आठवणी जाग्या केल्यात. लव्ह यू भाई, तू माझा भाग आहेस आणि नेहमी राहशील, अशी इमोशनल पोस्ट तिने केली.
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील व्हिडीओ पोस्ट करत सुशांत च्या आठवणींना उजाळा दिला आहे. कसे सुरू करावे आणि काय बोलावे हे मला माहित नाही परंतु होय आज मी तुम्हाला साजरे करण्यासाठी सुशांतचे काही जुने व्हिडिओ सामायिक करणार आहे .या तुझ्याबरोबरच्या फक्त आठवणी आहेत आणि मी नेहमीच तुम्हाला या लाल हार्दिकची आठवण ठेवेल, बुद्धिमान, रोमँटिक, वेडा आणि मोहक.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
