मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरुन एकीकडे विरोधक सरकारला कोंडीत पकडत असताना काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीदेखील घरचा आहेर दिला आहे. विरोधाभास वक्तव्यं सरकारची प्रतिमा खराब करत असून हे सत्ताधाऱ्यांच हप्ता वसुली कांड असल्याचं टीका संजय निरुपम यांनी केली आहे. याचे सर्व धागेदोरे शिवसेनेसोबत जोडलेले आहेत का? अशी विचारणा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे.
“शिवसेना परमबीर सिंह यांचा जयजयकार करत आहे. गृहमंत्री जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी आयुक्तांची चूक नसल्याचं सांगितलं आहे. ही विरोधाभास वक्तव्यं सरकारची प्रतिमा अजून मलीन करत आहेत. वाझे प्रकरणातील तपासावरुन आतापर्यंत हे सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड असल्याचं लक्षात येत आहे. याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का?,” असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस